जेआरडी माझा

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका महिलेकडून हेतूपूर्वक खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजात संभ्रम निर्माण करून त्यांच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजपा माढा तालुका, कुर्डुवाडी मंडल व भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय, माढा यांच्याकडे तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुर्डुवाडी यांच्याकडे मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेला त्वरित अटक करावे आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निवेदन महिला तालुकाध्यक्ष प्रतिक्षा गोफणे, माया माने, स्वाती गोरे, मेघना कोंडबळे, आशा घाडगे, संध्या कुंभेजकर, उषा गोरे, जयश्री कारंजकर यांच्या वतीने देण्यात आले.

जयकुमार गोरे यांचे जनतेशी असलेले प्रामाणिक नाते आणि त्यांचे कार्य समाजासमोर स्पष्ट असून, असत्य माहिती पसरवून त्यांच्या प्रतिमेला मलीन करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. या प्रकरणात चुकीची माहिती पसरवुन बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

या असत्य आणि भ्रामक आरोपांचा माढा भाजपा च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष योगेश पाटील, अविनाश भाऊ गोरे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस दत्तात्रय जाधव, अमोल गायकवाड, कुर्डुवाडी शहराध्यक्ष अतुल फरतडे, आबा पवार, विवेक कुंभेजकर, अनंत राऊत, पांडुरंग राऊत, प्रमोद रोटे, शांतीलाल झाडे, करण भगत यांच्यासह महिला व माढा तालुका भाजपा मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *