
करमाळा प्रतिनिधी
शासन युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येवून त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटूंबातील व्यक्तींना नोकरीमध्ये सवलत देत आहात. परंतु बदल्यांमध्ये माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना व त्यांचे नातु यांनाच सवलत मिळत आहे परंतु शहीद जवानांच्या पाल्यांना बदल्यांमध्ये सवलत मिळत नाही. तरी शहीद जवानाच्या पाल्यांना व पाल्यांच्या पत्नीला प्राधान्यक्रमाने बदलीमध्ये सवलत मिळावी. तरी सन

२०२५-२६ सालातील शिक्षक बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. देशसेवेसाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूतीची भावना ठेवून सर्व विभागात शहीदांच्या कुटूंबियांना प्राधान्यक्रमाने मदत व सवलत दिली जाते परंतु शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शहीद जवानांच्या पाल्यांना व पाल्यांच्या पत्नीना कोणतीही सुट व प्राधान्यक्रम दिला जात नाही. सदर बदली प्रक्रियेत शहीद जवानांचे पाल्य व पाल्यांच्या पत्नी यांना बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रम व सुट मिळावी हा मुद्दा शासन निर्णयात घेवून न्याय देण्यात यावा. हा मुद्दा शासन निर्णयात घेतल्याने शासनावर कोणत्याही प्रकारचा अधिभार पडणार नाही. त्याचबरोबर शहीद जवानाचे पाल्य व पाल्यांची पत्नी यांची शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.

शहीद जवानांचा देशाप्रती असलेला त्याग व देशप्रेम लक्षात घेता सन २०२५-२६ सालातील शिक्षक बदली प्रक्रियेत शहीद जवानांच्या पाल्यांना व पाल्यांच्या पत्नीला प्राधान्यक्रम व सुट मिळणेबाबत योग्य तो शासनस्तरावरून निर्णय होणोबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा.