
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत अश्विनी थोरात-खेडकर यांनी बचत, डिमॅट खाते, CDSI , NDSL, सेबी, शेअर मार्केट, प्राथमिक व द्वितीय बाजार, शेअर बाजारातील सुरक्षित गुंतवणूक, शेअर बाजारातील धोके, शेअर बाजाराशी संबंधित अनेक संकल्पना, बचत गुंतवणूकीतील धोके व्यवस्थापन, गुंतवणूकीच्या विविध संधी या अनुषंगाने सखोल व अतिशय सुलभ शब्दात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांनी विद्यार्थांना शेअर बाजाराचा अभ्यास करून त्यामध्ये करिअर करण्याचे आवाहन केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अंकुश करपे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले.
