
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबेच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरचा कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. महिला दिनाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. पैठणी, सोण्याची नथ, चांदीचा छल्ला महिलांनी विविध बक्षिसे पटकाविली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच समस्त ग्रामस्थ म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वाशिंबे परिसरात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन होत असल्याने महिलांमध्ये याविषयी उत्सुकता पहायला मिळाली.

प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदार्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने आल्याचे सांगण्यात आले. अँकर अपर्ना यांनी महिलांसाठी विविध खेळाच्या फेर्या घेतल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या भक्ती तेजस कळसाईत पैठणी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.द्वितीय बक्षिस जयश्री रमेश सपकळ यांना सोन्याची नथ तर तृतीय विजेत्या सिद्धी प्रताप पाटील यांना चांदीचे छल्ला बक्षीस देण्यात आले. तसेच 50 प्रोत्साहन पर महिलांना आकर्षक बक्षीस देऊन ३५०० सँनिटरी पँड चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.