
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनवर येथे क्षितिज ग्रुपच्या सानिध्यात 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान आणि आदर्श महिलांचे वेश परिधान करून त्यांच्याविषयी विचार

व्यक्त केले. गभाले सरांनी सर्वांचे स्वागत केले. गणेश करे पाटील यांनी क्षितिज ग्रुपच्या सर्व सदस्यांचा परिचय करून दिला आणि ह्या ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी क्षितिज ग्रुपच्या वतीने शाळेतील हुशार व गरजू मुलींना वह्या, कंपास, पेन, सॅक, पाण्याची बाटली अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोलापूरच्या वंदना मोकाशी ह्यांचे तर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यश कल्याणी सेवाभावी संस्थेमार्फत गणेश करे पाटील यांनी शाळेत दोन स्मार्ट टीव्ही देण्याचे

आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी क्षितिज ग्रुपच्या सदस्या स्वाती माने, पुष्पा फंड, कावेरी देशमुख, सुप्रिया येवले, मंजू देवी, नलिनी जाधव, माधुरी साखरे, नीलिमा पुंडे, डॉ. सुनिता दोशी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ थोरवे हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लहू गभाले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनींनी केले. किरण शिंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका निंबाळकर मॅडम, केदारलिंगे मॅडम, त्याचबरोबर अण्णासाहेब जाधव सर, नसिरुद्दीन शेख सर, किरण शिंदे सर, विनोद वारे सर यांनी परिश्रम घेतले.