करमाळा प्रतिनिधी

      करमाळा (जि. सोलापूर) मतदार संघातील कुकडी कालव्याचे अस्तरीकरण निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार आमदार नारायण पाटील यांनी मंत्री जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन केली आहे. त्यावर मंत्री मोहदय यांनी तात्काळ याची दखल घेऊन कार्यकारी संचालक पुणे अतुल कपोले यांना निर्देश देऊन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

     सध्या कुकडी डावा कालव्याचे रब्बी- 2 आवर्तन सध्या सुरु आहे. पोंधवडी चारी (ता. करमाळा) येथे शेतकरी व ग्रामस्थांनी सध्या सुरु असलेले अस्तरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. मौजे कोर्टी हद्दीमध्ये हवालदार वस्ती येथे बऱ्याच ठिकाणी अस्तरीकरणाचे प्लास्टर उखडत असल्याचे दिसून आले. जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासनाने कुकडी प्रकल्पासाठी सुप्रमा, प्रथम, द्वितीय व तृतीय सुप्रमांद्वारे कोट्यावधी रुपये खर्च उक्त योजनेसाठी केलेला खर्च अशा ठेकेदारामुळे सर्व व्यर्थ जात असल्याची भावना सर्व सामान्य ग्रामस्थ, शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. कुकडी कालव्याचे अस्तरीकरणाचे काम गुणवत्तेचे होण्यासाठी संबंधित ठेकेदारावर उचित कारवाही करुन त्रयस्त शासकीय एजेन्सी नियुक्त करणे गरजेचे आहे.

   तरी कुकडी कालव्याचे अस्तरीकरण निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने संबंधित ठेकेदारावर उचित कारवाई करणेची मागणीही केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *