करमाळा प्रतिनिधी

दि.4 मार्च रोजी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अबॅकस ची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुथा अबॅकस अकॅडमी च्या संचालिका ज्योती मुथा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस विषयी मार्गदर्शन केले. अबॅकस मुळे

मुलांमध्ये असणारी गणित विषयाची भीती कमी होते.त्यांना गणित विषयाची आवड निर्माण होते तसेच इतर सर्व विषय अतिशय सोपे वाटू लागतात. अबॅकस मुळे मुलांच्या मेंदूला चालना मिळते तसेच मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे होतो. अशाप्रकारे अबॅकस चे महत्त्व मुथा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.तसेच प्रात्यक्षिका मधून त्याची माहिती दिली. या वेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *