
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नागरिकांना पुरविण्यात येण्याऱ्या सुविधांची ग्रामपंचायत कार्यालयाकडून जास्त प्रमाणात शुल्क आकारणी केले जाते. जी आकारणी शासकीय शुल्क आकारणीच्या कितीतरी जास्त असते. गावातील सामान्य गोरगरीब लोकांच्या खिशाला परवडणारी नसते. यातून नागरिकांचे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येते.

या कारणास्तव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शासकीय शुल्क आकारणी फलक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 च्या कलम तीन अन्वये बसवण्यात यावे किंवा सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी असे पत्र कोर्टी ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण, प्रहार शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, घराचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते भारत चव्हाण यांनी गटविकासअधिकारी करमाळा यांना पत्र दिले आहे.
