
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात कॅरम असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक संजय सावंत, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे व महेश निकत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फारुख जमादार हे ही उपस्थित होते. शहरात कॅरमप्रेमीं

मध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रथम अख्तर शेख, झहीर बागवान, द्वितीय हृतिक आलाट, गणेश मंडलिक, तृतीय निलेश राक्षे, वैभव साने, चतुर्थ तबरेश सय्यद, दीपक खलसे, पंचम सोनू करंडे, सागर आलाट तर षष्ठी जयदीप शिंदे, विकास पवार असे बक्षिसे जाहीर करण्यात आले.

यासाठी संजय सावंत, प्रशांत ढाळे, सचिन घोलप, संतोष वारे, संजय शिंदे, ऍड. अमर शिंगाडे, महेश निकत यांनी सहकार्य केले. बक्षीस व ट्रॉफी वितरण शिवजयंती दिनी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस काँ. वाडगे, अरुण काका जगताप, नाना मोरे यांनी हे बक्षीस वितरण केले.

या कॅरम स्पर्धेचे नियोजन सचिन घोलप, जयदीप शिंदे, तबरेश सय्यद, नाना कुलकर्णी, विकास पवार, दिपक खलसे, रिआज बागवान, आख्तर शेख, महेश कांबळे सर यांनी केले.