करमाळा प्रतिनिधी

पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण संमारंभ नुकताच मोठ्या उत्साहात‎ संपन्न झाला. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी एकत्र‎ येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.‎ यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार माजीद भाई काझी तसेच सरपंच रोहिणीताई संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, करमाळा

तहसीलचे आटोळे, मा. सरपंच दादासाहेब जाधव, मा. पंचायत समिती सदस्य विलास काका मुळे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बापूसाहेब जाधव, डॉ. संजय बुधवंत, प्रगतशील बागायतदार नानासो जाधव, मा. पंचायत समिती सदस्य शशिकांत केकान, मा. सरपंच महादेव तात्या फुंदे तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी, सर्व शालेय समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ

उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.‎ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन‎ करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक किरण परदेशी सर व प्रताप बरडे सर यांनी पालक‎ व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात संबोधित केले.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना‎ सादर केली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन पट दाखवणारी नाटिका कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. वार्षिक स्नेहसंमेलन समारंभाचा समारोप शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर यांच्या आभार प्रदर्शनाने‎ झाला, ज्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सहाय्यक‎ कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांची कबुली दिली आणि‎ पाहुण्यांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार‎ मानले.‎

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *