करमाळा प्रतिनिधी

       19 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण देशभरात शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने व अभिमानाने साजरी केली जाते.

त्याचप्रमाने स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल करमाळा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवगर्जना करून सुरुवात करण्यात आली. यानंतर स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच झुलवा पाळणा, आस्ते कदम, युगत मांडली अशा प्रकारचे गीत, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात अतिशय उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे यांची वेशभूषा खूप छान प्रकारे केली होती. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *