
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

करमाळा येथील ‘हमाल भवन’ येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक फारूक जमादार, संचालक मनोज गोडसे, वालचंद रोडगे, मयूर देवी, विलास जाधव, सरपंच भोजराज सुरवसे, सरपंच धनंजय शिंदे, बाबा घोडके, देवा लोंढे, अल्लाउद्दीन शेख, हुमरान मुलाणी, आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर करमाळा शहरातून हलगी व ताशा द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकीनंतर हमाल भवन याठिकाणी भीमराव लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. यावेळी गणेश झोळ, रामा कारंडे, विजय रोडगे सर, उमेश हवालदार, मार्तंड सुरवसे, माऊली सुरवसे, पै. गणेश सावंत, अतुल शिंदे, बापू बेंद्रे, विठ्ठल इवरे, भागवत वाघमोडे, सतीश मोटे, शिंगटे सर, संदेश उबाळे, शेंडे भाऊसाहेब, महेश मोरे, विशाल रासकर, साजिद बेग उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, दिनकर चव्हाण, प्रमोद गायकवाड, अनिल रासकर, चतुर्भुज घाडगे, किशोर ताकतोडे, विठ्ठल गायकवाड, शकील शेख, सचिन चांदगुडे, सतीश खंडागळे, राजेंद्र कांबळे, संजय गायकवाड, पप्पू रोडगे, शरद यादव, गणेश कांबळे, सतीश केकाण, सुभाष शेंडगे, महादेव कांबळे, यांनी परिश्रम घेतले.