
करमाळा प्रतिनिधी
पंचशील स्पोर्ट अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा तालुक्याच्या तहसीलदार ठोकडे मॅडम तसेच करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, नगरसेवक पप्पू सावंत, बहुजन रिपब्लिकनचे अध्यक्ष देवा लोंढे, भाजपचे जगदिश अगरवाल, अफसर जाधव, रामा ढाणे, नगरसेवक राजू आव्हाड, उद्योजक बाबा घोडके, उद्योजक संतोष जाधव, जयकुमार कांबळे, पंचशील स्पोर्टस सोशल क्लबचे सचिव विश्वनाथ लोंढे, उद्योजक मनोज ताकतोडे, संजय जगताप ई. मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन केले व रनिंग स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

शालेय गट मुली तीन किमी प्रथम क्रमांक अनुष्का महेंद्र शिंदे, द्वितीय क्रमांक विभा विलास अलदर, तृतीय क्रमांक गीतांजली दादासाहेब मोरे, चौथा क्रमांक सायली सुरवसे, पाचवा क्रमांक समृद्धी सागर चौधरी, खुला गट मुली पाच किमी प्रथम क्रमांक अश्विनी नवनाथ हिरवे, द्वितीय क्रमांक प्रिया देविदास कांबळे, तृतीय क्रमांक प्रियंका कैलास काळे, चौथा क्रमांक अनुष्का महेंद्र शिंदे, पाचवा क्रमांक ऋषिका गणेश माने, शालेय गट पाच किमी मुले, प्रथम क्रमांक सुमित अंकुश सरक, द्वितीय क्रमांक तेजराज सुदाम खरात, तृतीय क्रमांक अभिषेक मंटू पंडित, चौथा क्रमांक मेघराज शिवाजी गायकवाड, पाचवा क्रमांक विश्वराज तात्या कवेकर, खुला गट दहा किमी मुले, प्रथम क्रमांक विनायक बाळासाहेब तोडकर, द्वितीय क्रमांक अभिजीत

संतोष धोत्रे, तृतीय क्रमांक नागेश दौंड, चौथा क्रमांक ओंकार संतोष भोसले, पाचवा क्रमांक मेघराज शिवाजी गायकवाड तसेच विशेष सत्कार स्केटिंग स्पर्धेमध्ये ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंद झालेले सात्विक श्रीकांत गरड राहणार पिंपळवाडी तालुका करमाळा यांचा तहसीलदार ठोकडे मॅडम व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विशेष सत्कार करून ट्रॉफी भेट देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे पंचशील स्पोर्ट क्लब अँड प्रतिष्ठान च्या वतीने नामा भाऊ लोंढे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सुमंत नगर येथून निघणाऱ्या मिरवणुकीच्या रथाचे पूजन मान्य वराच्या हस्ते करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी डीजेच्या तालावर मिरवणुकीने रवाना झाले. छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला व तिथे पंचशील स्पोर्ट अँड सोशल प्रतिष्ठानचे लेझीम लेझीम पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. पुतळ्या समोर संस्कृती जयकुमार कांबळे यांनी तलवारबाजी व काठी फिरवण्याचा कार्यक्रम केला तसेच रितेश विश्वनाथ लोंढे यांनी दांडपट्टा व काठी फिरवण्याचा कार्यक्रम केला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील स्पोर्ट अँड स्वच्छ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव लोंढे, पैलवान ग्रुपचे सनी जाधव, गणेश झाकणे, पंचशील स्पोर्ट चे उपाध्यक्ष उमरान मुलानी, दादा घोडके, सौदागर बनसोडे, निळकंठ हिंगसे, रविंद्र ओहोळ, सुनील कांबळे, सचिन गळगटे, ऋषिकेश सूर्यवंशी, अक्षय धनवे, सोनू घोडके, अमोल आव्हाड, अक्षय दामोदरे, राहुल कांबळे, पेंटर राजू कांबळे, महादेव टकले, संतोष भोसले, मुन्ना साळवे, बाळू आवड, गणेश कांबळे, रोहन ओहोळ, अफजल मुलानी, अकबर तांबोळी, दिनेश जांभळे, नागेश ओहोळ वरील सर्वांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.