करमाळा प्रतिनिधी

शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक संघटना यांच्या वतीने विविध कार्यक्रम सादर करून शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा सजावट करण्यात आली. रांगोळी काढून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. सर्व जाती धर्माच्या उपस्थित मान्यवर राजकीय अराजकीय सर्व समावेशक मानून शिव व्याख्याते भीमराव लोंढे

यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शिव धर्मा नुसार शिवाजी वंदना जिजाऊंची वंदना घेण्यात आली. यानंतर 500 लोकांना पोट भर शिव अन्नदान करून शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. असेच सर्व महापुरुष यांच्या विचारांचा वसा पुढे कायम चालू ठेवत कोणत्याही प्रकारची कोणालाही काहीही गरज पडल्यास 1 हात मदतीचा देत प्रतिष्ठान पदाधिकारी सामाजिक बांधिलकी जपणार देव देवता यांना फाटा देऊन महापुरुषांच्या विचाराने स्वराज्य निर्माते देशाचे दैवत शिवाजी महाराजांच्या काळात

ज्यांनी तोरण बांधुन स्वराज्याच्या हितासाठी शिवाजी महाराज यांच्याशी निष्ठा ठेऊन राज्य घडवणार्‍या मावळ्यांच्या इतिहास आहे. शिवाजी महाराज हे कोण्या जातीचे नसून ते अखंड भारत व जगाचे राजे होते. असा पुन्हा राजा होणे नाही. शिवाजी महाराज यव्हढा पातशाह बादशाह बहुजन झाला. ही सामान्य गोष्ट झाहली नाही. असा  राज्या पुन्हा होणे नाही. यावेळी सर्व अध्यक्ष पदाधिकारी करमाळा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी शिव प्रेमी करमाळा पोलीस अधिकारी राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक संघटना करमाळा तालुक्यातील शेकडोंच्या उपस्थित जयंती साजरी केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *