करमाळा प्रतिनिधी  

झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साही वातावरनामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका स्वाती बिले मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे मुख्याध्यापक अमृता परदेशी मॅडम व सतिश कोंडलकर सर, क्रीडाशिक्षक तानाजी हरणावळ सर, सर्व शिक्षक स्टाफ व

शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. काही विद्यार्थांनी शिवरायांच्या कार्याबद्दल आपले अनमोल विचार मांडले. शंभूराजे साडेकर व ध्रुव क्षीरसागर यांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा करुन सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले. तसेच काही विध्यार्थी मावळ्यांच्या भूमिकेत होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अतुलनीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नफिसा घोडके मॅडम यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *