करमाळा प्रतिनिधी

न्यू इरा पब्लिक स्कूल जेऊर येथे शिवजयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरुष लक्ष्मण शिरसकर या विद्यार्थ्याने शिवरायांची वेशभुषा

परिधान केली होती. केतकी सारंग कुलकर्णी (std -1st) हिने जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती व पूर्वा राहुल चव्हाण (Jr. Kg) हिने सईबाईंची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी शिवरायांचा इतिहास आपल्या वक्तृत्वाने सादर केला. काही

विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी शिवरायांच्या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले. घाडगे मॅडम यांनी शिवरायांचा इतिहास आपल्या वक्तृत्वाने सादर केला. अपेक्षा अवसरे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर अश्विनी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *