Full Shot Of Chatrapati Shivaji Maharaj Statue Located On Raigad Fort In Western Sahyadri Ghats

करमाळा प्रतिनिधी

शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका च्या वतीने 395 व्या शिवजयंतीची तयारी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून करमाळा येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये 18 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आताशबाजी करून, छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून 19 फेब्रुवारी च्या दिवसाची सुरुवात केली जाते. सकाळी 7 वाजता दुग्ध अभिषेक करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस वंदन करून सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये करमाळा शहरातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज तसेच ग्रामीण

भागातील जि.प. प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज मधील शिक्षक-विद्यार्थी यांच्या माध्यमातून लेझीम नृत्य, टीपऱ्या नृत्य, ग्रृप डांस व सामाजीक संदेश देणारे पथनाट्य सादर केले जाते व नवीन वक्ते व विचारवंत, वाचकवर्ग तयार व्हावेत यासाठी भाषनेही घेतली जातात. यामध्ये भरपूर जण सहभाग नोंदवतात. करमाळा शहरातील व ग्रामीण भागातील लेझीम संघ विषेश सहभाग नोंदवतात. मल्लखांब, मर्दानी खेळ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वात महत्त्वाचे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेतले जाते. यामध्ये रक्तदात्यांची संख्या ही फार मोठी असते. रक्तदानास सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारे शिवजयंतीच्या निमित्ताने सकाळी विविध कार्यक्रम घेतले जातात.

         शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने सर्वांना सुचित करण्यात येते की, 395 व्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी वार बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजता किल्ला वेस महादेव मंदिर करमाळा येथून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून ही मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे स्वरूप जय गणेश डीजे साऊंड व लाईट पुणे, नागनाथ लेझीम संघ शेटफळ, चाऊस बँड वैजापूर, सुजित बँड वाशी, अमर बँड बारामती, रज्जाक भाई बँड करमाळा, झंकार बँड करमाळा, भाई भाई बँड करमाळा, दोस्ती बँड करमाळा, अनिकेत फोटोग्राफी, एस.के. लीड वाल व CO2 पेपर ब्लास्टर तसेच घोडे व उंट हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व मिरवणुकीतील सजावट माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन हे करणार आहेत असे विविध प्रकारचे सकाळी व सायंकाळी कार्यक्रमाचे नियोजन शिवजयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील सर्वच शिवभक्त बांधवांनी सकाळी 7 वाजता छत्रपती चौक करमाळा व सायंकाळी 4 वाजता किल्ला विभाग महादेव मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे याची दखल सर्वांनी घ्यावी ही नम्र विनंती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *