
करमाळा प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षाप्रमाणे याहीवर्षी श्रीराम प्रतिष्ठान यांच्यावतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 16 तारखेस पार पडणार आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा श्रीराम प्रतिष्ठान करमाळाचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षाप्रमाणे याहीवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विवाह सोहळा रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, देवीचा माळ रोड, बायपास चौक करमाळा येथे रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:21 मी. संपन्न होणार आहे. याचे नाव नोंदणी 5 डिसेंबर 2024 ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्याचे आवाहन श्रीराम प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.

विवाह सोहळा चांगल्या प्रकारे संपन्न होवो यासाठी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते, श्रीराम प्रतिष्ठान, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा, जीएनसी मिल्क सेंटर करमाळा, कोर्टी, घारगाव हे परिश्रम घेत आहेत.