करमाळा प्रतिनिधी

शेलगाव के (ता. करमाळा) येथिल तन्मय तानाजी कटुळे याने महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकदून घेन्यात अलेलिया कर सहायक (टैक्स असिस्टेंट) परीक्षेत 302 गुण प्राप्त करुण राज्यात् प्रथम क्रांति मिळवला आहे.

तन्मय काटुळे याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण करमाळा येथील नगरपरिषद शाळेत, पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे कर्जत येथील श्री अमरनाथ विद्यालयात तर अकरावी व बारावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय झाले. त्यानंतर त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी येथे एग्रीकल्चरल इंजीनियरिंग (Agril.Engg) ही पदवी प्राप्त केली.

या यशामध्ये आई, वडील यांच्यासह मित्र परिवार व नातेवाईक, ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे तन्मय याने शेवटी बोलताना सांगितले. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *