
करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रिटेवाडी उपसासिंचन योजने बाबत शासकीय बैठक घेऊन तालुक्यातील ४० गावांची तहान भागवून द्यावी अशी मागणी भाजपचे गणेश कराड यांनी केली आहे.

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन करमाळा विधानसभा मतदारसंघातील रिटेवाडी उपसासिंचन योजने बाबत तातडीने शासकीय बैठक घेऊन तालुक्यातील ४० गावांची तहान भागवून द्यावी तसेच पांडे व पोंधवडी ग्रामपंचाय हद्दीतील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी असे पत्र अधिकारी यांना देण्यात आले आहे असेही गणेश कराड यांनी सांगितले आहे.
