करमाळा प्रतिनिधी

मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व शंभूराज देसाई यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी भेटून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आरक्षण व सवलती याबाबत निवेदन देऊन चर्चा केली होती. त्या दिलेल्या निवेदनाला अनुसरून बुधवारी

चंद्रकांत दादा पाटील यांनी मीटिंग लावली होती. या मिटींगला दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, संजीवजी भोर, राजेंद्र कोंढारे, अंबाजोगाईचे व्यंकटेश देशमुख, ओबीसी विभागाचे व नियोजन विभागाचे पदाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. मोहितकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव बी.वेणू गोपाल रेड्डी इत्यादी

उपस्थित होते. या मीटिंगमध्ये पंजाबराव देशमुख वस्तीगृह भत्ता योजना व राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या दोन्ही योजना पूर्वीप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत राबविण्याची मागणी केली, BBA व BCA ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु ॲडोक फी बाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता त्याबाबतची सर्व माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिली, केंद्र सरकारच्या EWS आरक्षणाचा लाभ SEBC विद्यार्थ्यांना मिळावा याबाबत सविस्तर चर्चा झाली. याचबरोबर इतरही शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *