
करमाळा प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौडरे या विद्यालयाची एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेत यशस्वी कामगिरी. विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

हर्षवर्धन बापू अंबारे, नागेश दत्तात्रेय रेनावकर, समर्थ महावीर कोपनर, सचिन पोपट माने, राधा रमेश नलवडे, जगदीश गोवर्धन वाघमोडे, अजिंक्य अजित सावंत, रोहित मच्छिंद्र पारेकर, धनाजी महादेव जाधव, दिव्या रवींद्र जगताप, हनुमंत महादेव काळे, शिवम तात्या अवघडे हे गुणवंत विद्यार्थी आहेत.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक सांगडे सर व प्रशालेचे शिक्षक रणमोडे सर, जगदाळे सर, पवार सर, नाळे सर, गायकवाड सर, गोफणे सर, खाडे सर आणि प्रेरणा अंबारे मॅडम तसेच प्रशालेतील सर्व सेवक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.