करमाळा प्रतिनिधी

आज न्यु इरा पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेज चिखलठाण येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध उद्योजक -उद्यान पंडित किरण नवनाथ डोके (संस्थापक KD ऍग्रो प्रॉडक्ट्स) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

यावेळी पाचवीच्या च्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “मानवी मनोरे”इयत्ता तिसरी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच”लेझिम ” मध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी अतिशय शिस्तबद्ध व तालबद्ध आपली कला सादर केली. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.

वार्षिक क्रिडा सप्ताहात ज्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली त्या सर्वांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. Senior K.G. च्या श्राव्या वायसे या विद्यार्थिनीने “दिल दिया है जान भी देंगे” या गीत गायनाने सर्वांचे लक्ष वेधले. होमी भाभा बालवैज्ञानिक परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील विजेत्यांना व एलिमेंटरी परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी यांना प्रमाणपत्र व सरपंच ग्रामपंचायत चिखलठाण यांच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी खाऊवाटप करण्यात आले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नवनाथ डोके, संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र बारकुंड व संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड सर, पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली वाघमोडे, प्रेरणा तिवारी व हराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल रोकडे यांनी केले. हा देखणा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष,  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ड्राइवर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *