करमाळा प्रतिनिधी

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या स्व स्वरूप संप्रदायाचे काम प्रेरणादायी आहे असे मत विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले. करमाळा येथील‌ पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीन वाटप करताना ते बोलत होते. स्व स्वरूप सांप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत करमाळा तालुक्याच्यावतीने जगद्गुरु नरेंद्र महाराज ‌पादुका दर्शन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये करमाळा येथील यशवंतराव

चव्हाण महाविद्यालय प्रांगणात करमाळा येथे 27 जानेवारी रोजी संपन्न झाला. पुढे बोलताना विलासराव घुमरे सर म्हणाले की, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या स्व स्वरूप सांप्रदायामार्फत हिंदू धर्म रक्षणाबरोबर यशस्वी जगण्यासाठी जीवनात भक्तीची गरज लक्षात घेऊन उपासनेचा मार्ग सांगितला जात असून अनेक भाविक भक्त सन्मार्गाने यशस्वी जीवन जगत आहेत. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा मानव कल्याणाचा मंत्र त्यांनी समाजाला दिला असून खऱ्या अर्थाने समाजाच्या

कल्याणासाठी करीत असताना धार्मिक शैक्षणिक सामाजिक कौतुकास्पद आहे. त्यांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाचा‌ जीवनात अवलंब करून सुखी संपन्न जीवन जगावे असे आवाहन विलासराव घुमरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‌सकाळी नऊ वाजता जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकाचे आगमन करमाळा येथील छत्रपती चौक येथे झाले. यानंतर श्रींच्या पादुकाची ‌भव्य मिरवणूक करमाळा शहरातील ‌प्रमुख मार्गावरून सव्वा ते मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त शिष्य साधक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पादुकाचे आगमन झाल्यानंतर ‌ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या‌ नामाचा गजर करण्यात आला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत 27 गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे सर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. गजानन गुंजकर, मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल,‌ जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर‌, मा.नगरसेविका संगीताताई खाटेर, शिवसेना शहराध्यक्ष अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक सचिन घोलप, भाजप किसान मोर्चा जिल्हा नरेंद्रसिंह ठाकुर, उद्योजक अमर साळुंके, भाजप उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, सुखा संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांच्या उपस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीनची वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे कार्य नक्कीच महान असुन त्यांच्या पादुका दर्शनाचा लाभ आपल्या करमाळाकरांना मिळत आहे हे आपले परमभाग्य असून भाविक भक्तांची उपस्थिती नक्कीच नरेंद्र महाराज यांच्या परमेश्वरी शक्तीची कार्याची प्रचिती देणारा असून देव देश धर्मकार्यासाठी आत्मकल्याणासाठी सुखी समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग मिळण्यासाठी करमाळा तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन दर्शन सोहळा घेण्यासाठी तन मन धनाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनभूषण जागृती दर्ण यांचे प्रवचन झाले. त्यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे कार्य गुरूची महती सांगुन मानव कल्याणासाठी भक्तीची गरज असल्याचे सांगितले असुन आपल्या जीवन सुखी समृद्ध करण्याबरोबरच मोक्ष प्राप्तीसाठी स्व स्वरूप सांप्रदायात सहभागी होऊन कल्याण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पादुका पुजन करून शेकडो भाविकांनी उपासक दिक्षा घेतली. या पादुका दर्शन सोहळ्याला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे भक्त, शिष्य, साधक, भाविक भक्त, नागरिक, महिला, पुरुष, बालगोपाळासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव मारुती भोसले, सोलापूर महिला अध्यक्ष सविताताई परांडे, सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष देविदास ननवरे, सोलापूर जिल्हा कर्नल अशोक केळकर, दौरा प्रमुख गणेश पाचर्णे पश्चिम महाराष्ट्र पीठ सह प्रमुख अमोल कुलकर्णी, करमाळा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले, माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, महिला तालुकाध्यक्ष रोहिणी सरडे, विशेष कार्यवाहक संतोष हंडाळ व स्व स्वरूप सांप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समितीने परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *