करमाळा प्रतिनिधी

करमाळा एसटी महामंडळातील आवारामधील थांबलेल्या विकासकामांना गती मिळणेबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी पत्र दिले.

या पत्रात असे म्हटले आहे की, वरील विषयान्वये करमाळा एस. टी. महामंडळातील आवारामधील विकासकामे चालू झाली होती. परंतु सद्यस्थीमध्ये काम बंद पाडलेले आहे, मुखमंत्री विकासनिधीमधून ही कामे चालू होती. आगारामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुशोभीकरण, सिमेंटीकरण तसेच मूलभूत सुविधा होणीकामी निधी मंजूर केला होता.

करमाळा डेपोतून मोठ्या प्रमाणात प्रवासी नाशिक, मुंबई, पुणे सोलापूर तसेच तालुक्यामधील प्रत्येक गावातील प्रवासी प्रवास करत असतात तसेच मोठ्या प्रमाणात भरणारी आदिनाथ संगोबा यात्रा महाशिवरात्रीला तसेच मागवारी तसेच तालुक्यातील यात्रा तसेच १० वी व बारवी परीक्षा सुरु झालेल्या आहेत. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात काम रखडलेले असून जागेअभावी बसेस तसेच प्रवाश्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी या सर्व गोष्टीचा विचार करता बंद पाडण्यात आलेल्या कामाला त्वरित गती देऊन काम सुरु व्हावे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *