
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सखर कारखानाच्या संचालक मंडळाची व प्रशासकीय मंडळाची मुदत संपून गेलेली असून लवकरच निवडणूक जाहीर होईल अशी माहिती आदिनाथ सह. साखर कारखान्याचे मा. संचालक डॉ. वसंत पुंडे यांनी दिली आहे.
तालुक्यात चार साखर कारखाने असून (दोन सहकारी व दोन खाजगी) बंद असल्याने ऊस सभासदाचे हाल होत आहेत. उसाचे क्षेत्र हे भरपूर असून तालुक्याच्या बाहेर ऊस घालण्याची वेळ आलेली आहे. आपल्या कारखान्याला आपण दहा-दहा हजार रुपये भरून शेअर घेतले असून काय उपयोग ?

साखर उद्योग अत्यंत अडचणीतून वाटचाल करीत असून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. ऊस तोडणी, वाहतूक, मजुराच्या अडचण, वेतन, आयोगानुसार कामगाराची पगार, कर्जावरील व्याज, कारखान्यातील इतर खर्च या सर्वांचा ताळमेळ करून सभासदाला इतर कारखान्याच्या तुलनेत भाव देणे म्हणजे तारेवरिय कसरत देणे.

श्री आदिनाथ साखर कारखाना बाबत मागे कोणी काय बोलले आहे ? कारखाना कर्जबाजारी कशामुळे झाला इ. गोष्टी उकरून, शोधून काही एक उपयोग नाही. तालुक्याच्या सभासदांना सर्व माहित आहेच. “आदिनाथ ची सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास जरूर करावा.”
खरी परीक्षा सभासदाचे आहे. सभासदाने गट तट, हेवेदावे, राजकारण न पाहता योग्य सकारात्मक विचाराचे संचालक मंडळ नेमाबे नाहीतर परत परत संचालकांचे भाडणे, भ्रष्टाचार, ख्वाबगिरी, खोटेनाटे करून स्वतःचे घर भरणे इ. गोष्टी नकोत. सर्व नेते मंडळी व जबाबदार सभासदाने एकत्र येऊन चांगला सकारात्मक मार्ग काढावा. नकारात्मक विचार आदिनाथच्या बाबत आणू नये.
आदिनाथ का वित्तीय देणी MSEB, NCDC, Bank of India, Icici, भैरवनाथ पतसंस्था, तोडणी वाहतूक, कर्मचारी पगार, पीएफ उसबील इ. साधारण 250 कोटी असेल. कर्जत प्रत्येक कारखान्याला द्यावे लागते पण ते वेळेवर फेडावे लागते. त्यासाठी कारखाना नियोजन करून व्यवस्थित चालवणे गरजेचे असते. पंढरपूरच्या श्री विठ्ठल कारखान्याकडे साधारणता 400 कोटीचे कर्ज आहे तरी तो व्यवस्थित चालत आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर का. भविष्यात चांगले दिवस निश्चित येतील पण केवळ साखर उत्पादना पुरते न राहता व उपपदार्थ निर्मितीवर भर दिला पाहिजे. आपला सह विद्युत प्र. 10-15 वर्षापासून बंद आहे. येथे आसबारी, इथीनॉल, बायोगॅस इ. उपपदार्थ होऊ शकतात. त्यामुळे सभासदाला वाढीव मोबदला देता येतो.
श्री आदिनाथ चा भूतकाळ कसाही असो पण भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक विचाराने सर्वांनी पहावे, एक विचाराने एकच यावे, युवाने पुढे यावे, युवाने कारखानाचा अभ्यास करून भाग घ्यावा असे आवाहन माहिती आदिनाथ सह. साखर कारखान्याचे मा. संचालक डॉ. वसंत पुंडे यांनी केले आहे.