
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे उंदरगाव ता. करमाळा जि. सोलापूर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या

शिबिरामध्ये विविध शेळ्या, मेंढ्या व जनावरांचे मोठया प्रमाणात लसीकरण कऱण्यात आले. पीपीआर (PPR) ही लस 150 देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी डॉ. मनीष यादव पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करमाळा व त्यांची टीम डॉ. झोळ

(सहाय्यक पशु वैद्यकीय अधिकारी), डॉ. गणेश बाबर, डॉ. राहुल जवळ, डॉ.दत्तात्रेय वाघमारे व गावचे सरपंच युवराज मगर, उपसरंपच शिवाजी कोकरे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना +स्तर सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा. सुजाता भोरे, प्रा. राहूल श्रीरामे, प्रा.संजय पाटील, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. रोकडे व (NSS) एन.एस. एसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.