करमाळा प्रतिनिधी

रावगावच्या पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करमाळा पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विस्तार अधिकारी मिनिनाथ टकले, केंद्रप्रमुख विश्वनाथ निरवणे, रावगावचे सरपंच रोहिनीताई शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, बापूसाहेब जाधव तसेच प्रशालेचे माजी मुख्याध्यापक बाबासाहेब सरडे तसेच रावगावचे ग्रामस्थ, पालक यांच्या उपस्थितीमध्ये प्रभातफेरी, क्रीडा ध्वज संचलन तसेच खेळाडूंना खिलाडूवृत्तीने खेळण्याची शपथ असा भरगच्च उद्‍घाटन सोहळा पार पडला.

शालेय क्रीडा महोत्सवात सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलिबॉल तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये धावणे, लांब उडी, दोरी उड्या, स्लो-सायकलिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये एकूण २०० च्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी, तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे आहेत. स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण होते. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. खेळात खेलाडूवृत्ती असली पाहिजे. खेळामुळे कृतीशिलता येऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते, परंतु नवीन पिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणांसाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, क्रीडा शिक्षक प्रताप बरडे, अंजली लांडगे, पप्पु राठोड, सुहास कानगुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *