करमाळा प्रतिनिधी

चिंतामणी जगताप यांनी वैयक्तिक व राजकीय आकसापोटी कोर्टामधे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यां विरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केलेली असून प्रस्तुत फिर्यादीन्वये बाजार समिती कर्मचाऱ्यां विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करणेत येऊन चौकशी करण्याची मागणी केलेली होती परंतु सदरची मागणी रद्द करणेत आलेली होती. त्यानंतर मे. कोर्टाच्या आदेशान्वये प्रस्तुत फिर्यादीन्वये करमाळा पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये चौकशी करण्याचा आदेश पारीत झाला होता. त्याप्रमाणे करमाळा पोलिस यांचेमार्फत प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामधे बाजार समिती कर्मचारी यांचे जबाब नोंदविणेत आले. त्यावेळी प्रस्तुत प्रकरणाच्या अन्वये बाजार समिती कर्मचाऱ्यांनी कागदोपत्री पुरावादेखील दिलेला होता. त्या अनुषंगाने करमाळा पोलिस यांनी अहवाल सादर केला असून सदरच्या अहवालावरून बाजार समितीचे कर्मचारी यांना कोर्टात हजर राहणेबाबतचा समन्स काढणेबाबतचा आदेश पारीत झालेला आहे. वास्तविक र्चितामणी जगताप यांनी फिर्याद दाखल केली. त्यावेळी ते बाजार समितीचे उपसभापती (संचालक) होते. फिर्यादी मधे तथाकथित नमुद घटनेबाबत  त्यांना संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेवून योग्य ती कार्यवाही करणे अभिप्रेत असताना व स्वतः उप सभापती असताना कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नव्हती. परंतु सदरची संस्था व पद गेल्याचे शल्य मनात धरून स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या उद्देशाने बाजार समिती कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा शाबीत झाला आहे. या आविर्भावामधे असूरी समाधानाचा क्षणिक आनंद मिळविण्याच्या उद्देशाने न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेवून लोकांमधे संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्न आहे. वास्तविक बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलार यांचा उत्तम समन्वय व पारदर्शी कारभार असल्यामुळे समितीच्या उत्पन्नात व शेतकऱ्यांमधे बाजार समितीच्या कारभाराबाबत दिवसेंदिवस विश्वासार्हता वाढत असल्यामुळे त्यांचे मनस्वी दुःख झाल्याने राजकीय व वैयक्तिक आकसापोटी चिंतामणी जगताप बाजार समिती व कर्मचाऱ्यांबाबत व्यापारी व शेतकऱ्यांमधे अपप्रचार व संभ्रम पसरवून बाजार समितीची व कर्मचाऱ्यांची बदनामी करीत आहेत. चिंतामणी जगताप यांचे हे कृत्य म्हणजे “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग” अशा प्रकारचे असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो असे बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी सांगीतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *