
करमाळा प्रतिनिधी
देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या भव्य कीर्तनाचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या

पाठीमागील बाजूस करण्यात आली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती राहुल भैया जगताप, करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आज दिली. सदर कीर्तनासाठी महिला भगिनींची बसण्याची

स्वतंत्र व्यवस्था आयोजकातर्फे करण्यात आले असल्याचे सांगितले. या कीर्तनासाठी सुप्रसिद्ध तबलावादक आणि गायक उपस्थित राहणार आहेत. या कीर्तनासाठी वीट, देवळाली, खडकेवाडी, पिंपळवाडी, मोरवड, विहाळ, हिवरवाडी, करंजे, फिसरे, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव, शेलगाव, सौंदे, अर्जुन नगर, मिरगव्हाण, आदी गावातील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी करमाळा शहर आणि संपूर्ण करमाळा तालुक्यातील भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.