करमाळा प्रतिनिधी

देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांच्या 9 जानेवारी 2025 रोजी साजऱ्या झालेल्या जयंतीनिमित्त करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी (दादा) जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जे.सी.आर.पी. जिमच्या वतीने जिम इव्हेंट कॉम्पिटिशन चे आयोजन मेन रोड करमाळा येथील सुसज्ज अशा जे.सी.आर.पी. जिम मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बेंच प्रेस शोल्डर प्रेस व सपाट्या समाविष्ट होत्या. सदर स्पर्धा 55 किलो ते 65 किलो, 65 किलो ते 75 किलो, व खुलागट इत्यादी वजनी गटात समाविष्ट होत्या. सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा राहुल जगताप, प्रतापराव जगताप, दिपक चव्हाण, संजय घोरपडे, समाधान दास, सागर गायकवाड, मानसिंग खंडागळे,पप्पू शिंदे, अजय वस्ताद जाधव, अण्णासाहेब काळे, विशाल घोलप,सिद्धार्थ वाघमारे, सुनील भोसले, जयंत दळवी, आदी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

         करमाळा शहर व तालुक्यातून शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. 55 किलो ते 65 किलो या वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक – राम सरडे, द्वितीय क्रमांक – शंभू सोरटे, तर तृतीय क्रमांक – गणेश भिलारे यांनी पटकावला. याच स्पर्धेत 65 किलो ते खुल्या गटात प्रथम क्रमांक – सार्थक सरडे, द्वितीय क्रमांक – आयन तांदळे तर तृतीय क्रमांक – विक्रांत रवी जाधव यांनी पटकावला. खासबाब म्हणजे सपाट्याचे विशेष प्रदर्शन अवघे वय वर्ष 7 असलेली कुर्डूवाडी येथील संस्कृती भाऊ टोणपे या मुलीने एका दमात 300 सपाट्या काढत विक्रम केला. त्याबद्दल तिचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

     बेंच प्रेस या स्पर्धेमध्ये 55 किलो ते 65 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक – राहुल बनकर, द्वितीय क्रमांक – अथर्व माने तर तृतीय क्रमांक – रोहन मोरे यांनी पटकावला. या स्पर्धेत 65 किलो ते 75 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक – शाकिब कुरेशी, द्वितीय क्रमांक – पप्पू शिंदे यांनी पटकावला.

खुल्या गटात प्रथम क्रमांक – प्रतिक कांबळे, द्वितीय क्रमांक – यश माने, तर तृतीय क्रमांक – स्वप्निल पवार यांनी पटकावला.

    शोल्डर प्रेस या स्पर्धेत 55 ते 65 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक – मुस्ताकीन कुरेशी, द्वितीय क्रमांक – अभय परदेशी तर तृतीय क्रमांक – पुष्पक शहा यांनी पटकावला. तर याच स्पर्धेत 65 किलो ते 75 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक – राज गजरमल, द्वितीय क्रमांक – जय शेळके, तर तृतीय क्रमांक – पृथ्वीराज चिंतामणी जगताप यांनी पटकावला. खुल्या गटात प्रथम क्रमांक – कृष्णा पवार, द्वितीय क्रमांक – शाहरुख शेख तर तृतीय क्रमांक – शुभम माने यांनी पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांचा आयोजकांच्या वतीने मेडल देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण स्पर्धे करिता पंच म्हणून महत्वाची भूमिका महेश निकत सर, पृथ्वीराज सूर्यवंशी, समीर सय्यद, पप्पू शिंदे, उबेद शेख सर, इत्यादींनी बजावली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जे. सी.आर.पी. जिमच्यावतीने पृथ्वीराज जगताप, विश्वराज जगताप, कमलेश रच्चा, प्रताप रोडे-पाटील, सार्थक दोशी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *