
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित लहान गट खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट संघाने मंगळवेढा या संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट (ता. करमाळा) येथील मैदानावर नुकत्याच पार पडल्या.

केंद्रप्रमुख वैशाली महाजन, शिक्षक नेते सुनील कदम, महेश होनकळसे, गणेश कोरपे, अभिजित गायकवाड, तात्यासाहेब जगताप, दादासाहेब बर्डे, तात्यासाहेब जाधव, विनोद ढेरे, गोरख ढेरे, मेजर संदीप ढेरे, भाऊसाहेब गायकवाड, संजय चोपडे यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट विजेत्या संघातील खेळाडूंची व मार्गदर्शक शिक्षकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी संघाचे मार्गदर्शक चंद्रहास चोरमले, सूरज शेवाळे यांच्यासह यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

विजयी संघातिल खेलडू प्रणव महादेव मार्कड, मयुरेश ज्ञानदेव थानके, समर्थ रेवनत खैरे, आविष्कार रेवननाथ काळे, यश हनुमंत फाले, वेदांत पिपाध्या कायके, राजमिस्त्री संदीप काहाड़े, अश्विन योगीराज जगदाळे, शौर्य चंद्रकांत जगदाळे, प्रज्वल गोस्वामी पथाडे, सत्यार्थ अन्ना काळे, संगीतकार नागेश भांडवलकर , श्लोक अमरजीत ग्लोब, ऋतुराज काकासाबे काकडे, ओंकार एसके फूल आहेत.
वीट विकास फाउंडेशन व ग्रामपंचायत वीट यांच्या संयुक्त विद्यमाने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती