करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दिनांक 31/12/2024 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. व्ही. देशमुख यांनी केले ग्रंथ प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके ठेवण्यात

आली होती. त्यामुळे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अवांतर पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांना झाली. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 01/01/2025 रोजी या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.अनिल साळुंखे हे प्रमुख व्याख्याते

म्हणून उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की,  वाचन संस्कृती चळवळ जोपासायची असेल तर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येऊन क्रमिक पुस्तकांशिवाय अवांतर वाचनाची पुस्तके म्हणजेच ऐतिहासिक कादंबऱ्या, आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कविता, वर्तमानपत्र, इ. नियमित वाचायला पाहिजे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमाद्वारे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड किंवा छंद तयार होऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणार आहे. तसेच या कार्यक्रमानंतर सामूहिक वाचन घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. व्ही. देशमुख होते. त्यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी प्रेरित केले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार या कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. ए. व्हि. गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *