
करमाळा प्रतिनिधी
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातुन ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तदार वाचनालय करमाळा नगरपरिषद येथील वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत ग्रंथालयत स्वच्छता मोहिम राबवून

ग्रंथालयातील निवडक ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवुन जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथालयाकडे कसे वळतील हा प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी, वाचक, सभासद, कर्मचारी तसेच विकी कांबळे, रोहित चौकटे, अजिम खान, संदिप आव्हाड, अमित कांबळे, दत्तात्रय घोलप, प्रदिप चौकटे, अमोगसिध्द परशेट्टी इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
