
करमाळा प्रतिनिधी
देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. विविध प्रश्नावर आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनता आणि लोकशाहीमधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. त्यामुळे पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी करमाळा यांच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव हिरडे आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा भाजपा बुद्धाजिवी आघाडी चे शहराध्यक्ष सूहास घोलप हे होते. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा भाजप च्या वतीने शशिकांत पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, जिल्हा चिटणीस शाम सिंधी, विनोद महानवर, बाळासाहेब कुंभार, किसान मोर्चाचे नरेंद्र ठाकूर, माजी शहराध्यक्ष आदेश कांबळे, शहर सरचिटणीस जितेश कटारिया, शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे उपस्थित होते.