करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील लाभ क्षेत्रात कुकडीचे आवर्तन जास्त दिवस असावे, लाभ क्षेत्रात पाणी आल्यावरच कालावधी मोजला जावा अशी मागणी कुकडी कालवा समितीच्या बैठकीत विद्यमान आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली. अहमदनगर येथे कुकडी कालवा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण

विखे पाटील हे होते. या बैठकीस अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील कुकडी लाभ क्षेत्र समाविष्ट मतदार संघातील सर्व आमदार व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदार संघांचे आमदार यांना निमंत्रण होते. नगर येथील बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्याची बाजू जोरदार पणे मांडली. यावेळी ते म्हणाले की, करमाळा तालुका हा कुकडी प्रकल्पच्या शेवटच्या टोकास आहे यामुळे एकतर आम्हाला हक्काचे असे पाणी मिळत नाही. याशिवाय करफड ता. कर्जत येथे पाणी

आल्यावर करमाळा तालुक्याच्या पाण्याची व मोजमापाची सुरुवात होते. वास्तविक पाहता करफड येथून करमाळा तालुक्यात पाणी येताना दोन दिवस लागतात. पण हे दोन दिवस नाहकपणे करमाळा तालुक्याच्या वाट्याला आलेल्या दिवसामध्ये धरले जातात. यामुळे याचा फटका करमाळा तालुक्यास बसतो. ही तांत्रिक बाब दूर करून ज्या वेळी कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करेल तेथून पुढे आमच्या कालावधीस मोजावे. यासह करमाळा तालुका हा शेवटच्या टोकास असल्याने आणखी पाच दिवस वाढवून आवर्तन दिले जावे. करमाळा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रातील सर्व भागात व तलावात मुबलक पाणी जातं नाही तो पर्यंत आवर्तन शक्य तेवढे दिवस चालू ठेवावे अशी आग्रही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे या बैठकीत केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *