करमाळा प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने लज्जा गौरी मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम साठी प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक सदस्य डॉक्टर अशोक काळे यांनी महिलांना सुलभ प्रसूती साठी मार्गदर्शन केले.

सुलभ नैसर्गिक प्रसूती साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पंचायत समिती करमाळा कडून हाती घेण्यात आलेल्या लज्जा गौरी मोहीमे अंतर्गत करमाळा येथे शनिवारी 3 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रम चे अध्यक्ष करमाळा तहसीलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे BDO डॉक्टर अमित कदम साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश्वर काटकर उपस्थित होते. बार्शी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य डॉ. महादेव खताळ उपस्थित होते. आरोग्य विभाग चे CHO, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक प्रसूतीसाठी आडवे न झोपता उभ्याने किंवा पायाच्या चवड्यावर बसून प्रसूती करण्यासाठीचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते. त्यालाच लज्जा गौरी म्हणून संबोधण्यात येते.

जगातील बहुतेक विकसित देशातील महिलंच्या डिलिव्हरीच्या काळात सिजेरियनचा दर हा 10% च्या आसपास असताना, भारतात तो 60%असल्याचा खळबळ जानकर खुलासा डॉक्टर अशोक काळे यांनी महिलांना प्रबोधन करताना केला.

नैसर्गिक प्रसूती साठी आपल्या पारंपारिक प्रसूती पद्धतीची माहिती त्यांनी दिली.

पूर्वी केर काढणे, जात्यावर दळण, जिने खाली वर करणे, खाली बसून धुणे भांडे करणे, पाटा वरवंटा वाटणे, हे आता कालबाह्य झाले, त्यामुळे जीवन शैलीत बदल झाले. परिणामी सीझरच प्रमाण वाढले. हे त्यांनी आवर्जुन नमुद केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी, नीलिमा पुंडे मॅडम, ललिता वांगडे, निशिगंधा शेंडे, मैत्री पाटील, शिला तळेकर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे सर, संघटक चक्रधर पाटील सर, भीष्मचार्य चांदणे सर,  अजीम खान, संभाजी कोळेकर, ब्रम्हदेव नलवडे, सुमित परदेशी, रमेश शिंदे सर, आदिनी परिश्रम घेतले, नीलिमा पुंडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर मैत्री पाटील हिने आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *