
करमाळा प्रतिनिधी
आज ग्रामपंचायत निंभोरे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच रविदादा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच रविदादा वळेकर, उपसरपंच संतोष पाटील, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामस्थ व ग्रामसंघाच्या महिला उपस्थित होत्या.

