
करमाळा प्रतिनिधी
ब्लू पॅंथर ग्रुप व बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा संस्थापक आशुतोष (भाऊ) शेलार यांच्यावतीने विविध उपक्रम राबवून भव्य अशी मिरवणूक काढून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला.

ब्ल्यू पॅंथर ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संघटना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने 1 जानेवारी 2025 रोजी १०:०० वाजता विजय स्तंभाची बुद्ध वंदना घेऊन पूजन करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून दशरथ कांबळे – शेतकरी संघर्ष समितीचे, प्रमुख उपस्थिती – आरपीआयचे नागेश कांबळे, दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी १०:३० मिनिटांनी रक्तदान शिबिर (मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापू) घेण्यात आले. यावेळी ती 63 जणांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पा ताई ठोकडे मॅडम तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संतोष वारे, नगरसेवक प्रशांत ढाळे उपस्थित होते.
सकाळी १०:४५ वाजता डोळे तपासणी शिबिर (एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय करमाळा) मधुमेह ब्लड प्रेशर तपासणी शिबिर, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण ईसीजी (हृदयाची पट्टी) कमल सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करमाळा घेण्यात आले. यामध्ये तब्बल 192 पेशंटने सहभाग नोंदविला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी (भाऊ) जाधव, संचालक शिवराज चिवटे हे उपस्थित होते.
दुपारी १२:०० वाजता कुटीर रुग्णालय व मूकबधिर शाळा येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून वंचितचे यशपाल कांबळे, प्रमुख उपस्थिती पोलीस सोमनाथ जगताप, मनीष पवार, जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे, उद्योजक बाबासाहेब घोडके उपस्थित होते.
सायंकाळी ४:०० वाजता सिद्धार्थ स्पोर्ट क्लब भीमकन्या लेझीम संघ यांनी अप्रतिम लेझीम चे डाव सादर केले व सायंकाळी 4:30 वाजता रामजी भीमराव कांबळे (वय वर्षे 10) अप्रतिम अशी मर्दानी खेळ दाखवले. शौर्य दिन मिळाला निमित्त सायंकाळी 5 वाजता भीमा कोरेगाव विजयस्तंभ च्या प्रतिकृतीची भव्य अशी वाजत मिरवणूक सुरू करण्यात आली. यातच देखावान भारतीय संविधानाची मोठी प्रत लावण्यात आली होती. मिरवणुकीचे उद्घाटक म्हणून नगरसेवक पप्पू सावंत, पोलीस उपनिरीक्षक बिबीशन जाधव, गोपनीय खात्याचे पोलीस अधिकारी दळवी, वंचितचे यशपाल कांबळे उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण करून भिमकन्या लेझिम संघास व मर्दानी खेळ सादर करणाऱ्या रामजी भीमराव कांबळे यांस भव्य ट्रॉफी व सन्मान पत्र पोलिस उपनिरीक्षक बिभीषण जाधव व वंचितचे नेते यशपाल कांबळे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन ब्ल्यू पॅंथर ग्रुप व बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक आशुतोष भाऊ शेलार, कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहेल दारूवाले, कार्याध्यक्ष बादल बडेकर. मिरवणूक प्रमुख शंभूराजे आहेर, उपाध्यक्ष हेमंत भागवत, आकाश धनवे, खजिनदार तुषार बडेकर, सचिव अभिजीत सूर्यवंशी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कांबळे, अलीम शेख, दीक्षांत लोंढे, सनी ताकतोडे, मंगेश ओहोळ, गुरु गायकवाड, सुमित साखरे, अरबाज पठाण, प्रशांत राजपूत, आर्यन शेख, चिंटू कांबळे, गणेश टकले, महेश वीर, गणेश झाकणे, अनिकेत नाळे, जीत भागवत, निहाल बडेकर, अनिस मुलानी, दिनेश दळवी, राज शेख, आशिष पठाण, दिनेश जांभळे, रोहन ओहोळ आदी जणांनी परिश्रम घेतले.