करमाळा प्रतिनिधी

भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.  यामध्ये देवळाली येथे नेत्ररोग निदान तपासणी शिबिर, करमाळा भाजपा संपर्क कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबीर व काव्य संमेलन अशा विविध उपक्रमांनी दिवंगत नेते अटलजिंची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी देवळाली येथील नेत्ररोग निदान शिबिरात 75 लोकांची तपासणी करण्यात आली व यातील 35 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व पंधरा लोकांचे मोफत ऑपरेशन करून दिले.

तसेच करमाळा येथील रक्तदान शिबिरात तालुक्यातील 103 व्यक्तींनी या शिबिरात रक्तदान केले तसेच कवी संमेलनाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील नामांकित कवींनी काव्य मैफिलीच्या माध्यमातून अटलजींना आदरांजली वाहिली या काव्यमैफीलीसाठी तालुक्यातील नामांकित कवी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त करमाळा भाजपाकडून  तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सामाजिक उपक्रमातून अटलजींना खरी आदरांजली वाहिली गेली आहे. आजही भारतीय जनता पार्टी ही स्वर्गीय अटलजिंच्या विचारसरणी ने वाटचाल करत आहे,  हीच वाटचाल भविष्यातही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी अविरतपणे चालू राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले, या कार्यक्रमासाठी भगवानगिरी गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, सरचिटणीस नितीन झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे, भैय्याराज गोसावी, आध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, राजश्री खाडे, चंपावती कांबळे, पुजाताई माने, सरपंच प्रवीण बिनवडे, लक्ष्मण शेंडगे, विष्णू रणदिवे, जयंत काळे पाटील, दादासाहेब देवकर, चंद्रकांत सरडे, धर्मराज नाळे, राजेश पाटील, किरण बागल, प्रकाश ननवरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *