
करमाळा प्रतिनिधी
कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयाची अवस्था पाहील्यानंतर सामान्य लोकांना अनेक बाबी खटकतात काहीजण याबाबत वेळोवेळी तक्रारी करत असतात मात्र मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांच्या नेतृत्वाखाली जेऊर येथील मंडल कृषी अधिकारी कार्यालयाने मात्र विविध सुविधा व कामकाजात सुसूत्रता आणून कार्यालयाचा कायापालट केला आहे.

जेऊर येथिल मंडल कृषी अधिकारी कार्यालयाचे नुकतेच संबंधित यंत्रणेकडून मुल्यांकन होऊन या कार्यालयास राज्यातील तिसरे रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2027 या कालावधीसाठी आहे. या मानांकनासाठी केळी पीक क्षेत्र विस्तार व निर्यात हब साठी केलेले कार्य, ठिंबक सिंचन व यात्रीकरण मध्ये पुणे विभागात सर्वाच्य काम व अनुदान वाटप कार्य, शेतकरी व कर्मचारी यांचेसाठी शुद्ध जल, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी, मौखिक व लेखी मार्गदर्शन, शेतकरी अभिप्राय, कृषी ग्रंथालय, कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष, नगण्य प्रलंबितता, फ्लो चार्ट, माहिती चार्ट, अभिलेख वर्गीकरण, सुसज्ज बैठक व्यवस्था, प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट, सर्वांना आयकार्ड, सर्वधर्मसमभाव साठी एक गणवेश, मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट, अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवस सह सूक्ष्म नियोजन, कृषी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य,राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी,कार्यालय रंगरंगोटी इत्यादी अनेक बाबींची सर्वेक्षण वअंकेक्षण, ॲडीट होऊन यावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे. यासाठी मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड यांच्यासह या कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
