करमाळा प्रतिनिधी

1 डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिन निमित्ताने ICTC विभाग उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्यामार्फत सर्व जमलेल्या लोकांना HIV/AIDS या आजाराबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन गुंजकर सर, प्रमुख उपस्थिती डॉ. अमोल डुकरे सर तसेच सर्व अधिपरिचरिका, व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. वरखडे सिस्टर यांनी उपस्थित सर्वांना HIV या आजाराबाबत माहिती दिली. त्याचबरोबर डॉ. गुंजकर यांनी WHO  कडून यावर्षी जाहीर केलेले घोषवाक्य Take The Rights Path याप्रमाणे HIV बाधित रुग्णांचे हक्क व अधिकार तसेच या आजाराबाबत असणारे समाज गैरसमज, उपचार, काळजी, दवाखान्यात पाळण्यात येणारी गोपनीयता याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ICTC समुपदेशक कपिल भालेराव यांनी उपस्थित सर्व रुग्ण व कर्मचारी यांच्यासोबत “जागतिक एड्स निर्मूलन दिन शपथ” याचे वाचन केले.

यावेळी रुग्णालयाच्या मेट्रन कडूपाटील, अधिपरिचरिका खाडे, गवळी, पठाण, समींदर, लांडगे, पोळेकर, भांडवलकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद खोबरे, पाठारे, आगलावे,विभूते,माळी, पावरा, सोळंकी, बंगाळे, दयाळ,बरगे, सरवदे, जवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल भालेराव यांनी केले. शेवटी आभार संतोष बरगे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *