करमाळा प्रतिनिधी

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील बाजूंस असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकूतीची विटंबना केली आहे. त्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात


आली. अशा आशयाचे मागणी चे पत्र करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हळ, जि. सं. देविदास भोसले, शहराध्यक्ष विशाल लोंढे, युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे, ता. संघटक शिवाजी भोसले, एकनाथ शिंदे, दादासाहेब भोसले, ब्रह्मदेव काळे, आण्णासाहेब महानवर, सचिन घोडके व महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संगीता गायकवाड व इतर कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *