
करमाळा प्रतिनिधी
आ. नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून कुगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची संधी मिळाल्यावर तिनही बाजूने ३० किलोमीटर पाण्याने वेढलेल्या कुगाव गावच्या दळणवळणाचा प्रश्न आमच्यासमोर होता. या गावातुन प्रवाशी वाहतूक पाण्यामार्गेच होते. गावाला चार जलमार्ग मंजूर आहेत परंतु जलमार्गातील धोके लक्षात घेता आम्ही प्रथम पुलाची मागणी केली. कुगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेत जोडपुलाचा ठराव मंजूर करुन शासन दरबारी पाठपुरावा चालु केला.

कुगाव ता. करमाळा ते इंदापूर जोडपूलाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात सरपंच ग्रामपंचायत कुगाव पदी कार्यरत असताना पासूनच्या सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक प्रयत्नास सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा इंदापूरचे कर्तव्यदक्ष आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या सहकार्यातून यश मिळाले. पुलाबाबत अजितदादा पवार यांनी विधानसभेत मंजुरी देऊन २३ ऑगस्ट २०२४ रोजी भुमीपूजन केले. मे T&T infra Ltd च्या माध्यमातून पुलाचे काम प्रचंड वेगाने चालु केले आहे. सदर काम ९०० दिवसात काम पुर्ण करणेबाबत आदेश आहेत. सदर पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडला जाणार आहे – तेजस्विनी दयानंद कोकरे (माजी सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता. करमाळा)
