सोलापूर दि. 26 नोव्हेंबर 2024 जिमाका- जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करण्याऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या सर्व योजनेतील थकबाकीदार लाभार्थींनी सदरच्या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
जिल्ह्यात महामंडळाच्या कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून त्यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहेत. थकीत कर्ज प्रकरणात वसुली व्हावी या करिता संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलतीची एकरकमी परतावा (OTS) योजनेस संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहनही ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.