
करमाळा प्रतिनिधी
वन परिक्षेत्र कार्यालय मोहोळ (प्रादेशिक) अंतर्गत वनरक्षक करमाळा (Forest Guard) आयेशा शेख यांनी आज स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी (करमाळा) ला भेट दिली. यावेळी प्राध्यापिका धनश्री दळवी यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि त्यांचें संरक्षण याबाबत माहिती देण्यात आली. तसेच माळढोक पक्षी यांची देखील माहिती सांगण्यात आली.

