
करमाळा प्रतिनिधी
नाभिक समाजाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त नाभिक समाज बांधव आझाद मैदानावर येणार आहेत.

आज कुर्डुवाडी शहर येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने ऊपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार यादव यांनी स्विकारले व हे निवेदन राज्य सरकारला तातडीने पाठवुन देऊ असे उपस्थित नाभिक समाज बांधवांना सांगीतले.

हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष ईश्वर गाडेकर, संजय महाराज गाडेकर, शुभम क्षीरसागर, सोमनाथ राऊत, यशराज राऊत, अजय काशीद, नंदकिशोर वाघमारे, अविनाश कोकाटे, रामभाऊ राऊत, पोपट गाडेकर, संतोष गाडेकर, सुधिर काशिद यांचे सह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
