
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने शहरातील पाणी व स्वच्छता सुरळीत होऊन पुर्ण दाबाने मुहिजीम तालीम मोहल्ला सह शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळेस संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष, नानासाहेब मोरे जि.उपाध्यक्ष, सतिश फंड शहराध्यक्ष, सचिन कणसे शहरउपाध्यक्ष, नागेश दुघाट, रहेनुमा चॅरिटेबल सोशल चे आझाद शेख, श्रीकांत चव्हाण मनविसे तालुकाध्यक्ष, संगीता

क्षिरसागर (कुभांर) मनसे महिला शहराध्यक्ष, भावना गांधी सामाजिक कार्यकर्ते, शेख भाभी, किरवे, आण्णा राऊत, फुरकान काझी, राजा क्षिरसागर व करमाळा शहरातील महिला उपस्थित होते.