
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलेल आहे त्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे अध्यक्ष स्थान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते यशपाल कांबळे यांना सर्वानुमते देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक जालिंदर नाना गायकवाड, जिल्हा संघटक विलास कांबळे, जिल्हा नेते उमेश (बालाजी) पोळ, तालुकाध्यक्ष प्रा. नवनाथ साळवे, सुहासजी ओहोळ, नंदू कांबळे सर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष जयश्री सावंत, तालुका निरीक्षक लक्ष्मण कांबळे,

तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषण यशपाल कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. यावेळी मछिंद्र चव्हाण, भाग्यश्री गरड, सारिका गरड, सरपंच शिवाजी भोसले, रणजित कांबळे, मयूर कांबळे, कालिदास पवार, तालुका संघटक बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब गायकवाड, अंकुश कांबळे, संदीप रेगुडे, राजरत्न कांबळे, नवनाथ भालेराव, विनोद रोडे, विलास काळे, श्रीमंत साळवे, श्रावण सरवदे, विक्रम साळवे, किशोर कांबळे, सुगत कांबळे, आकाश कांबळे, कचरू वाघमारे, बाळासाहेब कांबळे, प्रेमचंद कांबळे, लक्ष्मण कांबळे, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, सुरेश जाधव, बाळू गायकवाड, प्रवीण कांबळे, ज्ञानदेव काकडे, दिपक नागटिळक, गणेश कांबळे, राहुल आलाट, सावताहारी कांबळे, फिरोज शेख, आदी जण उपस्थित होते.