करमाळा प्रतिनिधी

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा नाभिक समाज कुर्डूवाडी शहराच्या वतीने भोरे वस्ती समोरील श्री नागन्नाथ महाराज मंदीर व श्री संत सेना महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याची सुरुवात श्री नागन्नाथ महाराज मुर्तीचा अभिषेक व पुजा संजय महाराज गाडेकर यांच्या शुभहस्ते करुन करण्यात आली.

मा. खासदार रणजितसींह नाईक निंबाळकर यांच्या फंडातील नियोजीत श्री संत सेना महाराज सभामंडपाचे भुमीपुजन करमाळा-माढा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फंडातुन साकारलेल्या श्री नागन्नाथ महाराज सभामंडपाचे लोकाअर्पण ही यावेळी करण्यात आले.

या नंतर सकाळी दहा वाजता ह.भ.प सुदाम कदम महाराज घाटणेकर यांचे प्रबोधपर किर्तन सुरु झाले.या वेळी भजनी मंडळाचा मंत्रमुग्ध भजनाने संत सेना महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री संत सेना महाराज यांचे जीवनपट सांगुन प्रतिमेवर फुले टाकण्यात आली.यावेळी विविध क्षेञातील मान्यवरांच्या शुभहस्ते व ऊपस्थीतीत महाआरती करण्यात आली.महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील, भोसरे गावचे सरपंच प्रतिनिधी नितीन कुंभार, वडशिंगचे सरपंच दत्ताजी जाधव, कुर्डुवाडी शहराचे ऊपनगरध्यक्ष प्रतिनीधी हरीदास बागल, मा.नगरअध्यक्ष निवृत्ती गोरे, ग्रामसेवक समाधान लोकरे, मा.नगरसेवक संभाजी सातव, संजय गोरे, पंचायत समितीचे अधिकारी महेश शेंडे, कर्मविर चव्हाण, भोसरे गावचे मा.सरपंच भारत काळे, ग्रामपंचायत ऊपसरपंच रवीराज बागल, ग्रामपंचायत सदस्य, सुधीर बागल, नितीन काळे, मनोज बागल, मा.नगरसेवक किसन हानवते, सोमनाथ देवकते, शिवसेना ऊपतालुका प्रमुख राजेंद्र वाल्मीकी, भाजपा शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड, श्रीकांत शेंडगे, RPI शहरअध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, गणेश समदाडे, ईरशाद कुरेशी, बबलु कांबळे, नरेंद्र साळुंखे, बापु सुरवसे, शैलेश काशीद भाऊसाहेब, मयुर जगताप, सुधिर क्षिरसागर, हरीश भराटे, बापु भोरे, रणधीर तात्या शिंदे, संदीप भराटे, जंवजाळ महाराज, हनुमंत जाधव, मोरे महाराज, कांबळे, कुंदन वजाळे, गणेश रिकीबे यांचे सह प्रमुख मान्यवर ऊपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर, रामदास राऊत, पोपट गाडेकर, संतोष गाडेकर, सुग्रीव दळवी, शहरअध्यक्ष ईश्वर गाडेकर, ऊपाध्यक्ष अजय काशिद, खाजिनदार अविनाश कोकाटे, सचिव बापु वाघमारे, वैजिनाथ राऊत, गणेश नाना गाडेकर, प्रकाश अवचर, अतुल राऊत, सुधिर काशीद, संजय काशीद, बंडु चौधरी, अनिल ठोंबरे, वसंत वाघमारे, गणेश भालेकर, विजय गाडेकर, गजेंद्र राऊत, शुभम सुर्यवंशी, नवनाथ हवलदार, पांडुरंग राऊत, पंडीत सर, बालाजी गाडेकर, नागजी ताटे, रवी राऊत, गणेश राऊत, बालाजी राऊत, माऊली दळवी, अशोक गाडेकर, नागजी ताटे, बंडु चौधरी, प्रदीप साळुंखे, बाळासाहेब म्हेञे, महादेव गाडेकर, बाबुराव सुर्यवंशी, दत्ता दळवी, दत्ता राऊत, विनोद गायकवाड, नागेश गाडेकर, योगेश गाडेकर, सोमा राऊत, यशराज राऊत, पंढरीनाथ गवळी, ओंकार गाडेकर, शुभम क्षिरसागर, अजित गाडेकर, मोहन गाडेकर, प्रथमेश गाडेकर, राजु सावंत यांचे सह अनेक समाज बांधव, महिला भगीनी, बालके मोठ्या संख्येने ऊपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *